मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत अनुष्का शर्माने माहिती दिली आहे की ती यापुढे चित्रपटांची निर्मिती करणार नाही आणि क्लीन स्लेट फिल्म्स (CSF) प्रॉडक्शन हाऊसमधून माघार घेत आहे. अनुष्का शर्माने लिहिले की, “जेव्हा मी माझा भाऊ कर्णेश शर्मासोबत CSF सुरू केले, तेव्हा आम्ही या क्षेत्रात नवीन होतो आणि आमच्यात एक आग होती.”
अनुष्का शर्माने पुढे लिहिले की, “आम्हाला भारतात वेगळ्या पद्धतीने मनोरंजन करायचे होते. आता जेव्हा मी माझ्या प्रवासाकडे मागे वळून पाहते तेव्हा मला दिसते की आम्ही यशस्वी झालो आहोत. याचा मला अभिमान आहे. मी कर्णेशला श्रेय देते ज्याने CSF ला आकार देण्यात मोठे योगदान दिले आहे.”
अनुष्काने लिहिले की, “आई झाल्यानंतर आयुष्यात खूप काही गोष्टी बदलतात. माझ्याकडे जो काही वेळ असेल तो माझ्या पहिल्या प्रेमासाठी म्हणजेच माझ्या मुलीसाठी असेल, इथून पुढे कर्णेश CSF) प्रॉडक्शन पुढे नेण्यास सक्षम असेल, आणि तो हे काम चांगले करेल या विश्वासाने मी CSF पासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.”
विराट कोहलीसोबत लग्न केल्यानंतर अनुष्का शर्मा चित्रपटांपासून देखील लांब होती. त्यावेळी तिच्याकडे केवळ निर्माता म्हणून पाहिले जात होते. नुकतीच अनुष्का शर्मा आई झाली आहे. आई झाल्यानंतर तिची जबाबदारी वाढली आहे. अनुष्का शर्मा लवकरच भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.