मुंबई : RCBचा नवा कर्णधार फाफ डू प्लेसिसने IPL 2022 च्या पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध केलेल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम केले. या सामन्यात डू प्लेसिसने 57 चेंडूंचा सामना केला आणि 57 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 88 धावा केल्या. या खेळीनंतर आरसीबीसाठी कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. याआधी, विराट कोहलीसह आरसीबीच्या कोणत्याही कर्णधाराने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले नव्हते.
आयपीएलच्या पहिल्या डावात कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी करण्याच्या बाबतीत डू प्लेसिस चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने किरॉन पोलार्डचा विक्रम मोडून त्याला पाचव्या स्थानावर ढकलले.
कर्णधार म्हणून पहिल्या डावात सर्वोच्च धावसंख्या
119 धावा – संजू सॅमसन
99 धावा – मयंक अग्रवाल
93 धावा – श्रेयस अय्यर
88 धावा – फाफ डु प्लेसिस
83 धावा – किरॉन पोलार्ड
पंजाबविरुद्धच्या ८८ धावांच्या खेळीच्या जोरावर डू प्लेसिसने आयपीएलमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या. या तीन हजार धावा त्याने 94 डावात पूर्ण केल्या आणि डेव्हिड वॉर्नरची बरोबरी करत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आला. आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात 3000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने 75 डावांमध्ये हा पराक्रम केला, तर केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
IPL मध्ये सर्वात कमी डावात 3000 धावा पूर्ण करणारे फलंदाज
75 डाव – ख्रिस गेल
80 डाव – केएल राहुल
94 डाव – फाफ डु प्लेसिस
94 डाव – डेव्हिड वॉर्नर
103 डाव – सुरेश रैना
104 डाव – एबी डिव्हिलियर्स
104 डाव – अजिंक्य रहाणे
या सामन्यात आरसीबीने 20 षटकात 2 बाद 205 धावा केल्या. यामध्ये विराट कोहलीने नाबाद 41 तर दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 32 धावांची खेळी केली. मात्र, पंजाबने 19 षटकांत 5 बाद 208 धावा करत सामना जिंकला.