WhatsApp will be banned
WhatsApp will be banned

व्हॉट्सअॅप (WhatsApp) दर महिन्याला लाखो खात्यांवर बंदी घालत आहे. फेब्रुवारी महिन्यातही WhatsApp ने लाखो खाती बंद केली आहेत. IT नियम 2021 नुसार, META च्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने फेब्रुवारी 2022 साठी अहवाल जारी केला आहे.

या अहवालात 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान 10 लाखांहून अधिक WhatsApp खाती बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या अकाऊंट्स प्लॅटफॉर्मवर हानिकारक कृत्ये (Harmful acts) करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

यामध्ये खोट्या बातम्या पसरवणे (Spreading false news) किंवा इतरांना त्रास देणे (Harassing others) समाविष्ट आहे. अधिकृत निवेदनात WhatsApp प्रवक्त्याने सांगितले की, ते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा वैज्ञानिक आणि तज्ञांमध्ये सतत गुंतवणूक करत आहेत.

ते WhatsApp वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलत आहेत. भारतातील IT नियम 2021 चे पालन करून त्यांनी 9व्या महिन्याचा अहवाल (फेब्रुवारी 2022) सादर केला आहे.

यूजर-सेफ्टी रिपोर्ट (User-safety report) मध्ये यूजर्सच्या तक्रारी आणि त्यावर WhatsApp ने केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. नवीन अहवालानुसार, WhatsApp ने फेब्रुवारी महिन्यात 1.4 दशलक्ष खाती बंद केली आहेत.

कंपनीने पुन्हा सांगितले आहे की, या प्लॅटफॉर्मवरील सर्व संदेश एंड-टू-एंड एनक्रिप्टेड (End-to-end encrypted) आहेत. याचा अर्थ प्रेषक आणि प्राप्तकर्त्याशिवाय इतर कोणताही तृतीय पक्ष तो संदेश वाचू शकत नाही.

कंपनीने स्पष्ट केले आहे की, WhatsApp, मेटा (फेसबुक) ची मूळ कंपनी देखील तो संदेश वाचू शकत नाही. खाते ब्लॉक करण्यासाठी WhatsApp अंगभूत गैरवर्तन शोध तंत्रज्ञान देखील वापरते.