lifestyle

दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी चांगली झोप, खाण्याच्या चांगल्या सवयी आणि नियमित व्यायाम (Exercise) हे खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की, माणसांचे एकमेकांशी चांगले वागणे सुद्धा माणसाचे आयुष्य वाढवू शकते. कोलंबिया (Columbia) विद्यापीठातील प्रमाणित मानसोपचारतज्ञ डॉ. केली हार्डिंग (Kelly Harding) म्हणतात की, चांगले व्यक्तिमत्त्व असण्याचा आणि इतरांशी दयाळू वागण्याचा शरीरातील आनंदी संप्रेरकांवर परिणाम होतो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सुमारे 7 वर्षे वाढू शकते.

डॉ. हार्डिंग यांच्या ‘द रॅबिट इफेक्ट’ या पुस्तकात त्यांनी असा दावा केला आहे की, मानवी दयाळूपणाचा त्याच्या रोगप्रतिकारक (Immunosuppressive) शक्तीवर आणि रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होतो. परिणामी लोक चांगले आणि दीर्घ आयुष्याचा आनंद घेऊ शकतात. ‘जेम्स एलिस न्यूट्रिशन’ (James Ellis Nutrition) चे आरोग्य प्रशिक्षक जेम्स एलिस यांचेही असेच म्हणणे आहे.

आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, चांगले वागल्याने आपला रक्तदाब आणि तणावाची पातळी कमी होते, ज्यामुळे वृद्धत्व वाढते. तसेच मानवी वृद्धत्वाची आणखी अनेक रहस्ये या अहवालात सांगण्यात आली आहेत.

चांगले मित्र बनवा (Make good friends) –
चांगले मित्र आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, मजबूत नातेसंबंध आणि सामाजिक आधार असलेल्या व्यक्तीच्या जगण्याची शक्यता कमी कनेक्शन असलेल्या व्यक्तींपेक्षा 22 टक्के जास्त असते. मित्र केवळ चांगले क्षण एकत्र साजरे करत नाहीत तर वाईट काळातही मदतीसाठी पुढे येतात. तसेच घटस्फोट किंवा गंभीर आजारादरम्यान येणारा ताण कमी करण्याचा प्रयत्न ते करातात.

चांगली वागणूक (Good behavior) –
अमेरिकेतील शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, इतरांना मदत करणे आणि त्यांना वेळ देणे याचाही आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. 2013 मध्ये, 846 लोकांवर पाच वर्षे केलेल्या अभ्यासाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

खूप हसणे (Laugh a lot) –
हसण्याने आपला मेंदू तर वाढतोच, पण कॉर्टिसोल आणि एंडोर्फिन सारख्या हार्मोन्सच्या उत्सर्जनामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तदाबही योग्य राहतो. मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 2010 मध्ये केलेल्या अभ्यासात असे सूचित होते की, जे लोक खूप हसतात ते सरासरी 79.9 वर्षे जगतात. तर त्यांच्यापेक्षा थोडे कमी हसणाऱ्या लोकांचे सरासरी वय 75 वर्षे आहे. तसेच जे लोक अजिबात हसत नाहीत ते सर्वात कमी 72.9 वर्षे जगतात.

या 3 गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा –
इतरांच्या मदतीसाठी नेहमी पुढे राहणे, स्वतःशी चांगले राहणे आणि चांगला श्रोता बनणे याचाही माणसाच्या आरोग्यावर आणि वयावर चांगला परिणाम होतो. बोस्टन स्कूल ऑफ मेडिसिन (यूएसए) द्वारे आयोजित 2019 च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, सकारात्मक मानसिक वृत्ती आपले आयुर्मान 11 ते 15 टक्क्यांनी वाढवू शकते.