मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हॉट अंदाजामुळे कायम चर्चेत असते. तिचा बोल्ड लूक कधी चाहत्यांच्या पसंतीस उतरतो तर, कधी या लूकमुळे मलायकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. दरम्यान, मलायका पुन्हा एकदा बोल्ड लूकमध्ये दिसली आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरलं होत आहे आणि यावेळीही मलायकाला तिच्या अतरंगी फॅशनमुळे ट्रोल केले आहे.

मलायका अरोराचा यावेळीचा लूक खूप वेगळा आहे. तिने ओव्हरसाईज व्हाईट शर्ट घातलेला असून त्यावर क्रीम कलरचा वुलन पोचू स्टाइल स्वेटर घातलेला आहे. यासोबत तिने हाय हिल्स घातलेले दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये मलायका नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. तसेच यावेळी तिने चेहऱ्यावर मास्क लावला आहे आणि केसांचा अंबाडा घातलेला दिसत आहे. परंतु या फोटोत विचित्र गोष्ट म्हणजे मलायकाने शर्टसोबत खाली कोणतीही जीन्स किंवा शॉर्ट्स घातली नाही. यामुळे युजर्स तिला ट्रोल करत आहेत.

व्हिडिओवर एका यूजरने ट्रोल करत लिहिले की, ‘तुम्ही तुमची पॅन्ट विसरलात का?’ तर दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘असे दिसते की ती काहीतरी घालायला विसरली आहे. लूक अपूर्ण दिसत आहे.’ पुढे ट्रोल करत आणखी एका यूजरने कमेंट केली की, ‘विचित्र लोकांचे अद्भुत जग.’ तर ‘घाईघाईत पँट घरीच राहिली.’ अशी देखील अनेकांनी कमेंट केली आहे. अश्या अनेक प्रतिक्रिया मलायका च्या या व्हिडिओवर येत आहेत.