मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी ही बी-टाऊनमधील लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक आहे. तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो काही मिनिटांत इंटरनेटवर व्हायरल होतो. नुकतीच दिशा पटानीच्या ‘आस्क मी एनीथिंग’ या सत्रादरम्यान एक चाहत्यांने दिशाला चक्क बिकिनी फोटोंची खुलेआम मागणी केली आहे.

दिशा पटानीने इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ सत्रादरम्यान तिच्या चाहत्यांशी संपर्क साधला. यामध्ये एका चाहत्याने विचारले, ‘बिकिनीमधील सर्वोत्तम फोटो कोणता?’ यावर दिशा पटानीने मजेशीर उत्तर दिले. दिशा पटानीने प्राण्याचा एडिट केलेला फोटो शेअर करत म्हणाली, “हा गोंडस प्राणी बिकिनी घातलेला आणि चष्मा घातलेला दिसत आहे.” दिशाचे हे उत्तर पाहून चाहत्यांना हसू अनावर झाले.

दिशा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून इंटरनेटचे तापमान वाढवत असते. तिच्या बिकिनी फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. कधी दिशा डान्स आणि स्टंट व्हिडिओ शेअर करते तर कधी ग्लॅमरस फोटो पोस्ट करून चाहत्यांवर वर्चस्व गाजवते.

दरम्यान, दिशा पटानी सलमान खानसोबत २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘राधे: युवर मोस्ट वॉन्टेड’ भाई या चित्रपटात दिसली होती. तसेच, टायगर श्रॉफची असलेल्या जवळीकमुळे दिशा कायम चर्चेत असते. दिशाने ‘एक व्हिलन रिटर्न्स’, ‘योधा’ आणि ‘क्टिना’ यासारख्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.