मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी या जोडप्याच्या लग्नावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिग्दर्शकाने रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या काम केले आहे. असे म्हटले जाते की इम्तियाज अलीचे दोन्ही स्टार्स सोबतचे नाते खूप चांगले आहे, तो या दोघांच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे.
बॉलिवूड स्टार्स आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण आतुर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे 14 एप्रिलला लग्न करणार आहेत. मात्र, त्याआधी 13 एप्रिलला दुपारी 2 वाजल्यापासून आलिया भट्टच्या मेहंदीचे फंक्शन सुरू होणार आहे. त्यांच्या वांद्रे येथील घरी हा कार्यक्रम होणार आहे. कुटुंबीयांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नसले तरी लग्नाची सुरू असलेली तयारी पाहता हे लग्न भव्यदिव्य होणार आहे, असे म्हणता येईल.
या जोडप्याच्या लग्नाला आता काही दिवसच उरले आहेत, अशा स्थितीत बॉलीवूडमधून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ज्यामध्ये चित्रपट निर्माते इम्तियाज अलीच्या नावाचाही समावेश आहे.
एका वृत्तानुसार, “जेव्हा दिग्दर्शक इम्तियाज अलीला रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘मी ज्या कलाकारांसोबत काम केले आहे त्यात रणबीर आणि आलिया यांचाही समावेश आहे. इम्तियाजने आलिया भट्टसोबत ‘हायवे’ आणि रणबीर कपूरसोबत ‘रॉकस्टार’ आणि ‘तमाशा’मध्ये काम केले आहे.
या सर्व चित्रपटांच्या शूटिंगच्या दिवसांची आठवण करून देताना तो पुढे म्हणला की, आलिया आणि रणबीर एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधीही त्यांच्यात वेगळ्या प्रकारचे कनेक्शन होते. दोघंही लग्न करत आहेत याचा मला आनंद आहे. पुढे तो म्हणाला, आलिया-रणबीरचे विचार एकमेकांशी खूप जुळतात. दोघांच्या नात्यात एक विशेष जोड आहे.”