DigiLocker : डिजिटल इंडियाला प्रोत्साहन म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिलॉकर सुरु केले होते. आता यामध्ये आणखी काही फीचर्स जोडले गेले आहेत. जाणून घ्या याचे फायदे.

देशात डिजिटल इंडिया उपक्रम पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी DigiLocker लाँच केले होते. आता DigiLocker ने यात काही नवीन फीचर्स जोडले आहेत. लाखो भारतीय त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, आधार कार्ड, मार्कशीट आणि वाहन नोंदणी (RC) सारखी इतर कागदपत्रे (Documents) जतन करण्यासाठी DigiLocker वापरत आहेत. डिजिटल लॉकर सेवेने आता आणखी एक मदत सुरू केली आहे जी देशातील ज्येष्ठ नागरिकांना मदत करेल.

डिजीलॉकर म्हणजे काय

सोप्या शब्दात डिजिलॉकर ही वेबसाइट किंवा डिजिटल स्पेस आहे (जसे तुमच्या कपाटाप्रमाणे) जिथे तुम्ही तुमच्या सरकारने जारी केलेले वेगवेगळे दस्तऐवज साठवू शकता. तुमच्या ओळखीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. ही क्लाउड स्टोरेज सेवा डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC) अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि IT (MeitY) मंत्रालयाने तयार केली आहे.

डिजीलॉकरद्वारे पेन्शन प्रमाणपत्र

डिजिटल प्लॅटफॉर्मवर काही काळापासून पेन्शन प्रमाणपत्रे जारी केली जात आहेत. नुकतेच बँक ऑफ महाराष्ट्रने वृद्धांना पेन्शन प्रमाणपत्र दिले आहे.

तुमचे पेन्शन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वापरा सोप्या स्टेप्स

वेबसाइटवरून किंवा तुमच्या स्मार्टफोनवरील अॅपवरून तुमच्या खात्यात लॉग इन करा.
साइन इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक/फोन नंबर आणि 6 अंकी सुरक्षा पिन विचारला जाईल
तुम्हाला एक OTP मिळेल जो तुम्हाला तुमच्या लॉकरकडे निर्देशित करेल.
लॉग इन केल्यानंतर, “कॅरोसेलमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र पेन्शन प्रमान” पहा किंवा वेबसाइटच्या डाव्या बाजूला असलेल्या मेनूमध्ये “दस्तऐवज शोधा” वर जा.
‘पेन्शन डॉक्युमेंट्स’ टाइप करा आणि तुम्हाला अनेक पर्याय मिळतील, तुम्हाला “बँक ऑफ महाराष्ट्र” निवडावी लागेल.
यादीतील लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला एक छोटा फॉर्म मिळेल ज्यामध्ये तुम्हाला जन्मतारीख आणि पेन्शनरचा OTP टाकावा लागेल.
सबमिट क्लिक करा
याशिवाय डिजीलॉकरने आणखी काही नवीन सेवा देऊ केल्या आहेत. या नवीन सेवांमध्ये कार विमा, पाण्याचे बिल (जम्मू आणि काश्मीरमध्ये) आणि व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादींचा समावेश आहे. डिजिलॉकर वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, 2015 ते 2022 या काळात तिच्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. सध्या 128.38 दशलक्ष भारतीय वापरतात. सध्या, डिजीलॉकरमध्ये सुमारे 5.6 अब्ज दस्तऐवज सेव्ह आहेत.