मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नाच्या इंडस्ट्रीत सध्या जोरदार चर्चा होत आहेत. त्याचवेळी, प्रसिद्ध चित्रपट समीक्षक केआरकेने आपल्या नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये आलिया भट्टचा कथित एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रावर टीका केली आहे. हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे.

या ट्विटमध्ये कमाल आर खानने सिद्धार्थ मल्होत्राची आलिया भट्टसोबतच्या नात्याची खिल्ली उडवली. त्याने लिहिले की, ‘एकदा आलिया भट्टसाठी सिद्धार्थ मल्होत्रा ​​माझ्याशी भांडला. आता आलियाने त्याला तिच्या लग्नाचे आमंत्रण दिले नाही. बरोबर समजले बेटा. धोबीचा कुत्रा ना घराचा ना घाटाचा.’ अशी जोरदार टीका केआरकेने सिद्धार्थवर केली आहे.

एवढेच नाहीतर केआरकेने आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये सलमान खानवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. केआरकेने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘रणबीर आणि आलिया हे खूप चुकीचे आहे की तुम्ही तुमच्या लग्नाला जुन्या लोकांना आमंत्रित करत नाही. अरे त्याचे स्वतःचे लग्न नाही, बिचाऱ्याला बघू दे.’ केआरकेने या ट्विटमध्ये कोणाचे नाव घेतले नसले तरी त्याचा हा तोला सलमानला आंबे हे दिसत आहे.

दरम्यान, ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या सेटवर आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर बराच काळ डेट केले. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही आणि 2017 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यानंतर सिद्धार्थ मल्होत्राचे नाव कियारा अडवाणीशी जोडले गेले तर आलिया भट्ट रणबीर कपूरला डेट करू लागली.