मुंबई : दाक्षिणेतील लोकप्रिय कपल अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला आहे. तेव्हापासून दोघे सतत चर्चेत पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्काच बसला होता. मात्र, धनुष आणि ऐश्वर्या यांच्यात अद्यापही मैत्रीचे नातं कायम आहे. धनुषनं त्याची पूर्वश्रमीची पत्नी ऐश्वर्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

धनुषपासून वेगळं झाल्यानंतर ऐश्वर्या रजनीकांत तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. नुकतंच तिचं नवं गाणं ‘पयानी’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याचं सोशल मीडियावर बरंच कौतुक होत असतानाच धनुषनं देखील या गाण्यावर प्रतिक्रिया देत ऐश्वर्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

धनुषने एक ट्विट केले आहे. या ट्वीटमध्ये धनुषनं लिहिलं, ‘तुझं नवीन गाणं ‘पयानी’साठी माझी मैत्रीण ऐश्वर्या तुला खूप शुभेच्छा’. धनुषच्या या ट्वीटवर ऐश्वर्यानंही त्याला प्रतिक्रिया दिली आहे. धनुषचं ट्वीट रिट्विट करत ऐश्वर्यानं लिहिलं, ‘धन्यवाद धनुष, Godspeed.’ दरम्यानं वेगळं झाल्यानंतरही या दोघांमध्ये असलेल्या या मैत्रीच्या नात्याने त्यांचे चाहते खुश झाले आहेत.

दरम्यान, 17 जानेवारी 2022 रोजी धनुष आणि ऐश्वर्या यांनी ते दोघंही एकमेकांपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. याची माहिती या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. जवळपास 18 वर्षांचा संसार मोडत हे दोघं वेगळे झाले आहेत. या घटस्फोटा मुळे धनुष च्या चाहत्यांना धक्काच बसला होता. दरम्यान, आता ऐश्वर्या आणि धनुष हळूहळू आपल्या कामावर परतत आहेत.