मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामात प्रथमच 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा संघ दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. दोन्ही संघांना स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे. दिल्ली आणि मुंबई यांच्यातील या सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. कारण, युवा ऋषभ पंतसमोर अनुभवी रोहित शर्माची फौज असणार आहे.
रविवारी दुहेरी सामना होणार असून त्यापैकी पहिला सामना मुंबई आणि दिल्ली यांच्यात होणार आहे. दुपारी 3.30 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील. रोहितला मुंबईत खेळण्याचा खूप अनुभव आहे तर पंतकडे कोणतेही मैदान स्वतःचे बनवण्याची क्षमता आहे.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हा सामना रविवारी 27 मार्च रोजी होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचा नाणेफेक दुपारी 3 वाजता होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील स्पर्धेतील दुसरा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टारवर थेट पाहता येईल.