मुंबई : बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय कपल अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल सध्या त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. दोघांचे प्रेमळ नातं पाहून त्यांचे चाहते कायम त्यांचे कौतुक करत असतात. तसेच, कतरिनाचे कौशल कुटुंबाशी असलेले नातंही चाहत्यांना खूप आवडते. यातच आता कतरीनाचा दीर आणि अभिनेता सनी कौशलने आपली वहिनी कतरिनाबद्दल एक खास गोष्ट सांगितली आहे.
मुलाखतीदरम्यान, जेव्हा सनीला त्याची वाहिनी म्हणजेच अभिनेत्री कतरिनाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने अगदी मनमोकळेपणाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी सनीने वहिनी कतरिना कैफसोबतच्या तिच्या बॉन्डिंगबद्दल सांगितलं. तो म्हणाला, “ती खूप छान आणि सकारात्मक व्यक्ती आहे. ती आमच्या कुटुंबात एका सकारात्मक उर्जेसारखी आली आहे. कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन ही एक अतिशय आनंददायी गोष्ट असते. ती अगदी साधी आहे. मी थोडा भारावून गेलो होतो. कारण मी तिला आधी ओळखत नव्हतो. पण शेवटी प्रत्येकजण माणूस आहे”,असं म्हणत त्याने आपल्या वहिनीचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, सनी कौशलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो, सध्या बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच तो अभिनेत्री नुसरत भरुचासोबत ‘हुडदंग’ चित्रपटात दिसणार आहे. 90 च्या दशकात अलाहाबादवर चित्रित झालेल्या या चित्रपटात सनी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहे. याआधी तो तमिळ सिनेमा ‘ फॉरगटन आर्मी’मध्ये दिसला होता.