Dasara Melava : (Dasara Melava) महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच दोन दसरे मेळावे होणार आहेत. ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि शिंदे (Eknath Shinde) गट आपापसात भिडणार असून, खरी शिवसेना कोणाची यावरून जोरदार राजकारण रंगताना दिसेल.

दरम्यान, शिवसेनेत पडलेल्या फुटी नंतर हा पहिलाच दसरा मेळावा होणार असून, संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागून राहणार आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा हजोंवर आहे तर, उद्धव ठाकरे गटाचा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे.

मुंबईतील (Mumbai) बीकेसी मैदानात होणाऱ्या शिंदे (Eknath Shinde) गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची ठेवली जाणार आहे. व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची रिकामी खुर्ची असेल. तर दुसरीकडे शिवतीर्थावरील ठाकरे(Uddhav Thackeray) गटाच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांच्या नावाची रिकामी खुर्ची ठेवली जाणार आहे.

दरम्यान, या मेळाव्यामध्ये दोन्ही गट एकमेकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळतील, उद्धव ठाकरे यांचा प्रमुख विषय हा एकनाथ शिंदे आणि भाजप असेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवरही टीका होण्याचे संकेत आहेत. तसेच विविध मुद्द्यांवरून केंद्राला धारेवर धरले जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी खास व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यात आली आहे तर या मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी योग्य ती सर्व व्यवस्था करण्यात अली आहे. राज्यभरातून चार-पाच हजार एसटी, खासगी बसगाडय़ा आणि हजारो खासगी वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत.

या कार्यकर्त्यानासाठी मैदानात लाखभराहून अधिक खुर्च्याची व्यवस्था करण्यात आली असून, या दोन्ही गटांचा दसरा मेळावा यशस्वी व्हावा, यासाठी जास्तीतजास्त कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे.