मुंबई : साऊथ सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित ‘KGF Chapter- 2’ आज १४ एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटाची देशभरात प्रचंड क्रेझ आहे, याच करणामुळे ‘KGF 2’ ने भारतात जबरदस्त आगाऊ बुकिंगचे आकडे नोंदवले आहेत. त्याचा परिणाम चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईवर पाहायला मिळणार आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करेल, असे सांगण्यात येत आहेत.
माहितीनुसार, ‘KGF 2’ चित्रपट पहिल्या दिवशी उत्तर भारतातून सुमारे 45 कोटी रुपये, तेलगू राज्यांमध्ये 35 कोटी, कन्नड बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पूर्ण 30 कोटी, तर तामिळनाडू आणि मल्याळम भाषेत हा चित्रपट 7 कोटी ते 6 कोटी रुपयांचा व्यवसाय करेल, असे सांगण्यात येत आहे.
या चित्रपटाला पहिल्या दिवसाच्या फर्स्ट शोमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मिळालेल्या अहवालांनुसार, चित्रपटाने देशभरात मॉर्निंग ऑक्युपन्सी अहवाल नोंदवला आहे. मॉर्निंग शोमध्ये चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये सुमारे 80 टक्के ऑक्युपन्सी रेट गाठला. तर काही चित्रपटगृहांमध्ये हा आकडा 100 टक्के दिसला. यामुळे येणाऱ्या काळात हा चित्रपट जबरदस्त कमाई करणार असल्याचे मानले जात आहे.