मुंबई : ‘KGF Chapter-2’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला २४ तासांत १०९ दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, हा एक मोठा रेकॉर्ड आहे. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सोशल मिडियाद्वारे सांगितले आहे.

दिग्दर्शक प्रशांत नील यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. प्रशांतने ‘KGF’ चे पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये यश हातात मशीन गन घेऊन पुढे जाताना दिसत आहे आणि यशाच्या मागे ट्रेलरच्या व्ह्यूजची संख्या आहे. इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानत दिशाने लिहिले, “आम्हाला इतकं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.”

चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर रॉकस्टार यश आणि बॉलीवूडचा खलनायक संजय दत्तचे चाहते त्याच्या मजबूत लूकची प्रशंसा करत आहेत. ट्रेलरमध्ये रॉकी भाई ‘यश’ची व्यक्तिरेखा खूपच दमदार दिसत आहे. दुसरीकडे संजय दत्तच्या ‘अधीरा’ लूकमुळे सोशल मीडियावर तुफान राडा चालू आहे. चाहते ट्रेलरवर जोरदार कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली, ‘अधीरा द परफेक्ट लूक’ दुसर्‍याने ट्रेलरमधील काही दृश्ये डीकोड केली आणि लिहिले, ‘रॉकी विरुद्ध अधीरा, रॉकी विरुद्ध अधीरा’.

‘KGF Chapter 2’ मध्ये यशसोबतच बॉलीवूडचा खलनायक संजय दत्त आणि बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि रामचंद्र राजू दिसणार आहेत. तसेच, हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. KGF चित्रपटाचा पहिला भाग 2018 मध्ये रिलीज झाला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिक कमाई केली होती.