csk
CSK's new captain will make big changes in the team !; This could be a potential Playing 11

नवी दिल्ली : IPL 2022, 26 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि केकेआर यांच्यात होणार आहे. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर केकेआरविरुद्ध सीएसकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्वाचे बदल होऊ शकतात. त्याचबरोबर नवा कर्णधार रवींद्र जडेजाही संघात काही बदल करू शकतो.

गेल्या मोसमात केकेआरला हरवून सीएसकेने विजेतेपद पटकावले होते. त्यात सर्वात मोठे योगदान ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस या सलामीच्या जोडीचे होते, पण यावेळी सीएसके संघात डू प्लेसिसच्या जागी एक धडाकेबाज फलंदाज आला आहे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेवोन कॉनवेने प्रवेश केला आहे. कॉनवे हा खूप चांगला फलंदाज आहे, जो ऋतुराज गायकवाडसोबत सलामी देऊ शकतो. रॉबिन उथप्पा तिसऱ्या क्रमांकावर उतरू शकतो. या क्रमांकावर फलंदाजी करताना उथप्पाने अनेक धावा केल्या आहेत.

अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर उतरू शकतो. या फलंदाजाने यापूर्वीही चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक मॅच-विनिंग इनिंग्स खेळल्या आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पाचव्या क्रमांकावर उतरण्याची खात्री आहे. धोनी जगातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक आहे. सहाव्या क्रमांकावर जाडेजा शिवम दुबेला संधी देऊ शकतो.

रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू आहे. जो अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचे फासे फिरवू शकतो. ड्वेन ब्राव्होला त्याच्यासोबत संधी मिळण्याची खात्री आहे. ब्राव्होची गणना सीएसकेच्या महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये केली जाते. ब्राव्हो कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेऊ शकतो.

यावर्षी भारताने 19 वर्षाखालील विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावले आहे. राजवर्धन हंगरगेकर याने यात महत्त्वाची भूमिका बजावली. रवींद्र जडेजा त्याला संधी देऊ शकतो. त्याचवेळी शार्दुल ठाकूरच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या अॅडम मिल्नेला खेळण्याची संधी मिळू शकते. तर ख्रिस जॉर्डनला 11व्या स्थानी संधी मिळू शकते.

केकेआर विरुद्धच्या पहिल्या सामन्यात सीएसकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिल्ने.