विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमावर टीका केल्याप्रकरणी दलित तरूणाला चक्क मंदिरात नाक घासायला लावलं आहे.

तसेच त्या तरूणाला मारहाण देखील झाली असून राजेश कुमार मेघवाल असे या तरुणाचे नाव आहे. तो एका खासगी बँकेत नोकरी करतो.

या प्रकरणात ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर यातील दोघांना अटक करण्यात आलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राजेश कुमारने दोन ते तीन दिवसांपूर्वी या सिनेमाविषयी फेसबुकवर टीका टिप्पणी केली होती.

त्याने या सिनेमाविरोधात एक पोस्ट लिहिली होती. अत्याचार का फक्त पंडितांवरच झाला आहे का? दलितांवर झाला नाही का? गरिबांवर रोज अत्याचार होत आहेत.

त्यांच्या सुरक्षेसाठी काहीच नाही. मेघवालच्या पोस्टमध्ये काही लोकांनी कमेंट करताना म्हटलंय की, ‘जय श्री राम’ आणि ‘जय श्री कृष्ण’.

त्याने त्यानंतर आपल्या या पोस्टबद्दल जाहीर माफी देखील मागितली आहे. मात्र काही लोकांनी त्याला मंदिरातच नाक घासायला लावलं. एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर त्या तरूणाला मारहाण देखील केली गेली.