Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

गुड न्युज ! यंदा पांढरं सोन शेतकऱ्यांना मालामाल बनवणार; कापसाच्या बाजारभावात विक्रमी वाढ, मिळाला ‘एवढा’ भाव

0

Cotton Rate Maharashtra : नुकताच दिवाळीचा सण साजरा झाला आहे. दिवाळीचा सण आटोपून आता जवळपास दहा दिवसांचा काळ उलटला आहे. पण राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी आता सुरू होईल अशी शक्यता आहे.

कारण की गेली अनेक दिवस दबावात असलेले कापूस बाजार पुन्हा एकदा तेजीत येऊ लागले आहेत. खरे तर दोन वर्षांपूर्वी पांढर सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला चांगला भाव मिळाला होता.

पण गेल्या हंगामात कापसाला अपेक्षित असा दर मिळाला नाही. या चालू हंगामात देखील अगदी सुरुवातीलाच मालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. जवळपास दिवाळीपर्यंत बाजारभाव दबावातच होते.

दिवाळीपर्यंत कापूस सात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विकला जात होता. आता मात्र हळूहळू बाजारभावात वाढ होऊ लागली आहे. बाजारभावाने साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी टप्पा नुकताच पार केला आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला ८७०० रुपये प्रति क्विंटल एवढ्या विक्रमी भाव मिळाला होता. दरम्यान आज राज्यातील अकोला जिल्ह्यात कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या बोरगावमंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मार्केट यार्डमध्ये आज पांढऱ्या सोन्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.

येथील मार्केटमध्ये आज कापसाला सात हजार 650 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी दर मिळाला आहे. म्हणजेच आता बाजारभाव जवळपास आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचले आहेत.

पांढरं सोन आता आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान पाहायला मिळत आहे.

शिवाय आगामी काळात आणखी भाव वाढ होईल अशी आशा देखील शेतकऱ्यांना लागली आहे. भाववाढीमुळे शेतकऱ्यांच्या आशा आता पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

आज बोरगाव मंजू एपीएमसी मध्ये कापसाला किमान 7150 रुपये प्रति क्विंटल, कमाल 7,650 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 7400 प्रतिक्विंटल एवढा विक्रमी दर मिळाला आहे.