मुंबई : सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग सध्या प्रेग्नेंट असुन तिची लवकरच डिलिव्हरी होणार आहे. याच महिन्यात भारती एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारताने एका गोड मुलीला जन्म दिला असल्याच्या बातम्या येत होत्या. या बातम्यांवर आता भारतीने प्रतिक्रिया दिली आहे.

शुटिंग दरम्यान भारतीने जेव्हा ब्रेक घेतला होता तेव्हा भारती लाईव्ह आली होती. या दरम्यान तिला या बातम्यांबद्दल विचारण्यात आले होते. यावर भारतीने सांगितले की, “माझ्याबद्दल असे बोलले जात आहे की मी मुलीला जन्म दिला आहे पण हे खरे नाही. मी ‘खात्री खत्राच्या सेटवर आहे. मला 15-20 मिनिटांचा ब्रेक मिळाला म्हणून मी थेट लाईव्ह आले. हे सांगायला की मी अजूनही काम करत आहे यावरून स्पष्ट होते की या बातम्या खोट्या आहेत. यामुळे चाहत्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. बाळ जन्मल्यावर हर्ष आणि मी तुम्हाला नक्की कळवू”, असं भारती म्हणाली.

पुढे डिलिव्हरीवर बोलताना भारती म्हणाली, “मला भीती वाटते, माझी तारीख जवळ आली आहे. मी आणि हर्ष बाळाबद्दल बोलत राहतो, कसं असेल. पण एक मात्र नक्की की बाळ खूप गमतीशीर असेल कारण आम्ही दोघेही गमतीशीर आहोत. ” असंही भारती म्हणली. दरम्यान, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या बातम्या जरी खोट्या असल्या तरी भारती लवकरच आई होणार आहे. तिला एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कधीही बाळ होऊ शकते. हा प्रेग्नन्सीचा काळ भारतीने एन्जॉय करत घालवला आहे. तिच्या बाळाची उत्सुकता आता चाहत्यांनाही लागली आहे.