CM Eknath Shinde : (CM Eknath Shinde) आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरु झाला आहे. कोरोनामुळं गेले दोन वर्ष निर्बंध असलेला हा उत्सव यंदा निर्बंधमुक्त असणार आहे. राज्य सरकारने यंदा नवरात्र उत्सवानिम्मित महिलांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

नवरात्रोत्सवाच्या शुभ पर्वावर महिलांसाठी (Women) खास अभियान राबविल जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” (Mata Surakshit Tar Ghar Surkshit) हे विशेष अभियान राबवलं जाणार आहे. प्रत्येक माता निरोगी राहावी यासाठी आरोग्य विभागाद्वारे (health campaign) हे अभियान राबवले जाणार आहे.

हे अभियान 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान चालणार असून, या अभियानाद्वारे समाजात स्त्रियांच्या(Women) आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी हा या अभियानाचा मुख्य हेतू होता. या अभियानात सर्व माता आणि भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडूनं ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ (Mata Surakshit Tar Ghar Surkshit) हे अभियान राबवलं जाणार असून, यासाठी सर्व महिलांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 9 ते 2 या वेळेत आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी . यासाठी 18 वर्षावरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या जाणार आहेत.

याचसोबत रक्त तपासण्या देखील केल्या जाणार आहेत. जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं नवीन बँक खातं उघडणं, गरोदर मातांचं आधारकार्ड जोडणं यांचा समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रावर या अभियानांतर्गत नवरात्र कालावधीत रोज माता आणि महिलांची तपासणी केली जाईल. या तपासणी दरम्यान आजारी महिलांना उपचारानुसार जिल्हा स्तरावर पाठविण्यात येणार असून, स्वतः वैद्यकीय अधिकारी तपासणी करणार आहेत. उपकेंद्र किंवा आरोग्यवर्धिनी केंद्रावर आरोग्य अधिकारी यांनी तपासणी करावयाची असून यासाठी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीमध्ये तपासणी शिबीरे घेण्यात येणार आहेत.

यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रूग्णालयांमध्ये तपासणी करणार आहेत. या अभिनयावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. मानवविकास कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक तज्ज्ञांची शिबिरे घेण्यात येणार आहेत. या अभियानाअंतर्गत सोनोग्राफी शिबिरे आणि कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांबाबतही माहिती दिली जाणार आहे.