CM Eknath Shinde : (CM Eknath Sinde) सध्या सणांचे (Festival) दिवस सुरु झाले आहेत, कोरोनामुळे गेली २ वर्ष कोणतेही सण उत्साहाने साजरे करता आले नाहीत. यामुळे यंदा मुख्यमंत्र्यांनी नवरात्र उत्सवानिमित्त तीन दिवस गरबा (Garba) खेळण्यास सूट दिली असून, रात्री बारा पर्यंत धवनीक्षेपक वापरण्यासही सूट दिली आहे.

यंदा 1 ऑक्टोबर या दिवशीही गरबा खेळण्याची आणि रात्री बारा पर्यंत धवनीक्षेपक वापरण्याची मुभा दिली गेली आहे. यामुळेच सोमवार 3 ऑक्टोबर आणि मंगळावर 4 ऑक्टोबर सहित शनिवारी म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजीही गरबा खेळला जाणार आहे.

दरवर्षी नवरात्रीमध्ये (Navratri) फक्त दोनच दिवस गरबा खेळात येतो, मात्र सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना एक दिवस अधिक गरब्याचा आनंद घेता येणार आहे.

नवरात्र (Navratri) हा उत्सव खूप थाटामाटात साजरा केला जातो. कोरोनामुळे गेली दोन वर्ष सण उत्सवात (Festival) साजरे करायला मिळाले नसल्याने, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे सर्वसामन्यांनी स्वागत केले आहे.

दरम्यान, या आधीही दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक नियमांमध्ये बदल केले होते. या बदलांचे अनेकांनी स्वागत केले आहे तर अनेकांना हा राजकीय डावपेच वाटतो.