CM Eknath Shinde :(CM Eknath Shinde) नाशिक येथे मोठी दुर्घटना झाली आहे. एका खासगी बसला आग लागली असून या आगीत जीवित हानी झाली आहे. या घटनेमध्ये अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

दरम्यान ही एक दुःखद घटना असून याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे तर जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

या घटनेत जखमी असणाऱ्यांचा उपचाराचा खर्च शासन करणार आहे. या दुर्घटनेचा सखोल तपास करून सर्व बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत. सध्या जी लोक जखमी आहेत त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान, ही बस मुंबईकडून यवतमाळकडे जात होती.

त्यावेळी एक ट्रकला धडकल्यामुळं ही आग लागल्याची घटना घडली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी घटनास्थळी स्वत: महापालिका आयुक्त हजर असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ही दुर्घटना (Bus Accident) नाशिक-औरंगाबाद (Nashik) मार्गावर नांदूरनाका (Nandur) या ठिकाणी घडली असून, या अपघातात 11 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एकूण 38 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक जवळ नांदूर नाका येथे बसला आग लागून हा मोठा अपघात झाला आहे.

यवतमाळकडून मुंबईकडे ही बस जात होती. या बसची एका ट्रकला धडक लागल्यामुळं आग लागली. बसने पेट घेतल्यानं त्यामधील काही प्रवाशांचा मृत्यू झालाआहे. दरम्यान, ही बस स्लीपर कोच होती.

दरम्यान या आगीत 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. 38 जण जखमी झाले असनू जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.