MVA Government : (MVA Government) महाराष्ट्रच्या हातून सुटलेला वेदांता प्रोजेक्टबद्दल (Vedanta Project) राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महा विकास आघाडी सत्तेमध्ये असतानाच हा प्रकल्प गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला गेला होता हा दावा साफ खोटा असल्याचे अजित पवार यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची (MVA Government) सत्ता असताना वेदांत-फॉक्सकॉनने (Vedanta Project) आपला प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतल्याचा महाराष्ट्र सरकारचा दावा सपशेल खोटा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  नेते अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार आणि विरोधी पक्ष शेजारच्या गुजरातमध्ये जाणाऱ्या कोट्यवधींच्या प्रकल्पांसाठी एकमेकांवर आरोप करत आहेत. भारतीय समूह वेदांत आणि तैवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉन यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत, सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प पूर्वी पुणे शहराजवळ उभारण्याचा प्रस्ताव होता, परंतु आता तो गुजरातला जाईल.

वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने (MVA Government) टक्केवारी मागितली होती असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. मात्र शेलारांच्या या आरोपाला अजित पवार यानी प्रतिउत्तर दिले आहे.

या प्रकल्पासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले होते, मग आता आमच्यावर का चुकीचे आरोप केले जात आहेत. जर आरोप केले आहेत तर त्याची चौकशी होउद्या, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अश्या शब्दात अजित पवारांनी खडेबोल सुनावले आहेत.