rishbh pant
"... can't make anyone a superhero ', Pant's big statement on young players

मुंबई : आयपीएल 2022, सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने युवा खेळाडूंबाबत मोठे वक्तव्य केले आहे. फक्त 2 महिन्यांत कोणत्याही खेळाडूला सुपरहिरो बनवू शकत नाही. असा पंतला विश्वास आहे. खेळाडूंना चांगले वातावरण देऊ शकतो पण कुणालाही सुपरहिरो बनवू शकत नाही. असे पंतने म्हंटले आहे.

पंतला गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद देण्यात आले होते आणि त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचला होता. पंतचे कर्णधारपद पाहून कॅपिटल्सच्या व्यवस्थापनाने त्यांचा जुना कर्णधार श्रेयस अय्यरला वगळले आणि पंत सोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी बोलताना ऋषभ पंत म्हणाला, “संघात समतोल असायला हवा. याचा अर्थ असा नाही की मी कर्णधार झालोय म्हणून मला सतत गंभीर राहावे लागेल. पण तुम्हाला गंभीर संभाषण करावे लागेल. उदाहरणार्थ, फिटनेस महत्त्वाचा आहे पण तुम्ही फक्त फिटनेसचा विचार करू शकत नाही.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “माझं प्राधान्य आयपीएल जिंकण्याला आहे. मी दोन महिन्यांत खेळाडू बदलू शकत नाही. तुम्ही त्याला सुधारण्यासाठी वातावरण देऊ शकता पण तुम्ही दोन महिन्यांत एखाद्याला सुपरहिरो बनवू शकत नाही.”