सध्या मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरू झाला आहे. तशा उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत चालल्या आहेत. वाढत्या उन्हा बरोबरच उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असणाऱ्या कलिंगडाची मागणी देखील वाढत आहे.
कलिंगड खरेदी करण्यासाठी लोक बाजारात गर्दी करत आहेत.पण महागडी कलिंगड खरेदी बद्दल अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात की, कलिंगड खरेदी करत असताना ते कसे निघेल? आतमधून लाल असेलच का असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात.
सध्या कलिंगडाची मागणी वाढत असून कलिंगडाचे दरही वाढले आहेत. त्यामुळे कलिंगड चांगले आहे. हे कसे ओळखावे यासाठी प्रथम कलिंगडच्या सालाचा रंग तपासा आणि कलिंगडावर एकतर पूर्ण हिरवे किंवा पिवळे पट्टे असतात.
गडद आणि हिरव्या रंगाचे साल असलेल्या कलिंगड हे आतून गोड असते.तर एकसारखे पट्टे असणारे कलिंगडही आतून गोड निघते.
पण फिक्कट रंगाचे किंवा त्य़ापेक्षा वेगळे हे कलिंगड गोड असेलच असे नाही. त्यामुळे सालावरुन कलिंगड कोणत्या दर्जाचे आहे हे लक्षात येऊ शकते.
कलिंगडाचे भाव हे वाढले असून सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे विक्रेत्याकडून जागेवरच कलिंगड कापून पहावे. आतमध्ये लाल असेल तर ते चवीला गोडही असते. त्यामुळे आतला भाग कापून पाहून कलिंगड खरेदी करणे आवश्यक आहे.