BSNL
BSNL

भारतीय दूरसंचार क्षेत्रात जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) चे वर्चस्व आहे. तरीपण सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएल (BSNL) च्या पोर्टफोलिओमध्येही अनेक आकर्षक योजना आहेत. कंपनी परवडणाऱ्या किंमतीसह दीर्घकालीन योजना ऑफर करते. म्हणजेच कमी खर्चात दीर्घकाळासाठी रिचार्ज प्लॅन. या योजनांमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही कमी खर्चात दीर्घकाळ टिकेल अशी योजना शोधत असाल तर तुम्ही या योजना वापरून पाहू शकता.

BSNL रु. 399 रिचार्ज –
या यादीतील पहिला प्लॅन (Plan) 399 रुपयांचा आहे. STV_399 मध्ये वापरकर्त्यांना दररोज 1GB डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता 80 दिवसांची आहे. म्हणजेच प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 80GB डेटा मिळतो.

इतकेच नाही तर यूजर्सना दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग (Unlimited voice calling) मिळते. यामध्ये यूजर्सना बीएसएनएल ट्यून आणि लोकधुन कंटेंटचा अॅक्सेस देखील मिळतो.

४२९ रुपयांना काय मिळत आहे? –
यादीतील दुसरी योजना देखील जवळपास सारखीच आहे. यामध्ये यूजर्सला ४२९ रुपये खर्च करावे लागतील. वापरकर्त्यांना STV_429 प्लॅनमध्ये 81 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 1GB डेटा मिळतो.

म्हणजेच या प्लानमध्ये यूजर्सना एकूण 81GB डेटा मिळतो. याशिवाय यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. वापरकर्त्यांना इरॉस नाऊचा प्रवेश देखील मिळेल.

447 मध्ये हे मिळणार –
याशिवाय यूजर्सना 447 रुपयांचा प्लान देखील मिळतो. यामध्ये यूजर्सना 100GB हायस्पीड डेटा मिळतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, वापरकर्त्यांना 80Kbps स्पीड इंटरनेट मिळत राहील. या प्लॅनची ​​वैधता 60 दिवसांची आहे.

यामध्ये दररोज अमर्यादित कॉल आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. STV_447 योजनेसह, वापरकर्त्यांना BSNL Tune आणि Eros NOW चे सदस्यत्व मिळते.

या प्लॅन मध्ये दररोज 2GB डेटा मिळणार –
BSNL च्या पोर्टफोलिओमध्ये 499 रुपयांचा प्लान देखील येतो. या प्लॅनची ​​वैधता तीन महिन्यांची आहे. युजर्सना 499 रुपयांमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. त्याची वैधता ९० दिवसांची आहे.

याच्या मदतीने यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणतेही OTT सबस्क्रिप्शन मिळणार नाही