मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वात हॉट जोडी म्हणून सद्या अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे लगेच व्हायरल होतात. नुकतंच करण आणि तेजस्वीला मुंबईत स्पॉट करण्यात आले. यावेळी तेजस्वी करणसोबत नवरीसारखी दिसली.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तेजस्वी हिरव्या रंगाच्या साडीत तिचा प्रियकर करण कुंद्रासोबत लाल सिंदूरमध्ये दिसली. फोटोंमध्ये दोघेही हुबेहूब नवरा-बायकोसारखे दिसत होते. यावेळी करण कुंद्रा गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाशचा हात घट्ट पकडताना दिसला. तर तेजस्वीही सर्वांसमोर करण कुंद्राला घट्ट मिठी मारताना दिसत आहे. हा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

दरम्यान, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशला ‘बिग बॉस 15’ नंतर बऱ्याच जबरदस्त ऑफर्स मिळत आहेत. आता दोघेही एका प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचे फोटो समोर आले. करण आणि तेजस्वीची जोडी चाहत्यांमध्ये आवडीची जोडी बनली आहे. या दोघांना चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे.