मुंबई : सुप्रसिद्ध ‘द कपिल शर्मा शो’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या’ द कश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा शो बंद देखील पडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. शोची टीआरपी कमी झाल्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात होते. या सर्व बातम्यांवर कपिल शर्माने अद्यापही काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, यावर आता अर्चना पूरण सिंहने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी अर्चना पूरण सिंहने सांगितले की, “होय, कपिल शर्मा शो काही दिवसांसाठी बंद होत आहे पण आम्ही लवकरच परतणार आहोत. आजकाल मी काही प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. ज्यामुळे मी तिथे व्यस्त असेल. मात्र, या प्रकल्पांबद्दल मी आत्ताच जास्त सांगू शकत नाही.” असं अर्चना यावेळी म्हणली. शो बंद होण्याच्या बातम्यांनी कपिल शर्मा शोचे चाहते मात्र खूप नाराज झाले आहेत.

दरम्यान, या बातम्यांवर शोशी संबंधित सूत्रांचे सांगितले की, “हा शो बंद होणार असल्याच्या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. शो अचानक बंद होत नाही आणि त्यावर प्लग खेचण्याची कोणतीही योजना नाही. आम्ही नेहमीप्रमाणे शूटिंग करत आहोत. खरे तर एप्रिल अखेरपर्यंत शूटिंग पूर्ण झाले आहे. तथापि, याचा अर्थ असा नाही की ब्रेक होणार नाही. जूनमध्ये शोला थोडा ब्रेक लागू शकतो, जेव्हा कपिल त्याच्या दौऱ्यासाठी अमेरिका आणि कॅनडाला जाईल तेव्हा” अशी माहिती शोच्या सूत्रांनी दिली आहे.