मुंबई : पाच वेळा आयपीएलचा विजेता संघ मुंबई इंडियन्सने आज त्यांचे नवीन गाणे लाँच केले आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून हे गाणे सोशल मीडियावर रिलीज केले आहे, ज्यामध्ये संघाचे अनेक दिग्गज खेळाडू या गाण्यावर नाचताना दिसले. कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अष्टपैलू किरॉन पोलार्डसह अनेक युवा खेळाडूही या खेळाडूंसोबत दिसले. मुंबई इंडियन्सच्या नवीन गाण्याचे नाव ‘एमआय बोलके….खेलेंगे’ असे आहे.
नवीन गाणे रिलीज करताना, मुंबई इंडियन्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘MI बोलके….खेलेंगे’. मुंबई इंडियन्स पलटण (चाहते), आमच्या खेळाडूंसाठी ब्लू आणि गोल्डमध्ये काही आवाज काढा. कारण आम्ही एक धमाकेदार नवीन गाणे सादर करत आहोत. या व्हिडीओमध्ये खेळाडूंशिवाय मुंबई इंडियन्सचे चाहतेही पूर्ण उत्साहाने संघाला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. तसेच यावेळी त्यांचे चाहते नव्या खेळाडूंनी सजलेल्या मुंबई संघाला पूर्ण पाठिंबा देताना दिसत आहेत.
IPL 2022 च्या 14 व्या सामन्यात, आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना मुंबई इंडियन्स (KKR vs MI) विरुद्ध पुण्यात होत आहे. मुंबई इंडियन्सचा आज हंगामातील तिसरा सामना KKR विरुद्ध होत आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये मुंबईला दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या तीन सामन्यात दोन विजय आणि एक पराभव स्वीकारला आहे.
𝑴𝑰 𝒃𝒐𝒍𝒌𝒆…𝒌𝒉𝒆𝒍𝒆𝒏𝒈𝒆 #DilKholKe 💪😎
Paltan, make some noise for our boys in Blue & Gold as we present a धमाकेदार new song! 🤩💙#OneFamily #MumbaiIndians #TATAIPL pic.twitter.com/rtQclJ1vqs
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम साऊदी आणि शिवम मावीच्या जागी पॅट कमिन्स आणि रसिक सलाम यांचा समावेश करण्यात आला. अनमोलप्रीत सिंग आणि टीम डेव्हिडच्या जागी सूर्यकुमार यादव आणि डेवाल्ड ब्रेविस यांचा मुंबई इंडियन्स संघात समावेश करण्यात आला आहे.