मुंबई : टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपली जबरदस्त ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या दुबईमध्ये आहे. दुबईमधून मौनी रॉय आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ खूप शेअर करत संपर्कात आहे. नुकतंच मौनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बीचवर एकाहून एक पोज देताना दिसत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला आहे.

मौनी रॉयने तिच्या पतीसोबत दुबईमध्ये वेळ घालवत आहे. मौनी रॉय पती सूरज नांबियारने तिचे हे फोटो क्लिक केले आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉयने दुबईच्या बीचवर अतिशय ग्लॅमरस स्टाईल दाखवत आहे. तिच्या पोजपासून ते तिचे एक्सप्रेशन लोकांचे लक्ष वेधून घेतले. मौनी रॉय बीचवर फ्लोरल वन पीसमध्ये दिसली. या ड्रेसमधील तिचा लूक खूप खतरनाक होता.

मौनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिले की, “काल आम्ही थोडेसे फिरलो, थोडी फुले घेतली, थोडेसे खाल्ले आणि प्यायलो, बीचवर पडून निळ्या आकाशाकडे पाहिले आणि पुढे निघालो.” मौनीचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहतेही तिची स्तुती करताना दिसत आहेत. काहीजण फायर इमोजी तर काही हार्ट शेप इमोजी शेअर करून मौनीच्या फोटोंवर कमेंट करत आहेत.

दरम्यान, मौनी रॉय लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुख्य भूमिका आहे.