मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच ‘पठाण’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या ती शाहरुख खानसोबत स्पेनमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दीपिकाचे या शुटिंग दरम्यानचे अनेक फोटो लीक होताना दिसत आहेत. दरम्यान, आता सुद्धा दीपिकाचा एक फोटो लीक झाला आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोत दीपिका बिकिनी लूकमध्ये दिसत आहे. यापूर्वीही तिचे असेच काही बोल्ड फोटो समोर आले होते. या फोटोत ती ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटेड बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोतील दीपिकाच्या लुकने चाहत्यांना तर घायाळच केलं आहे. चाहते फोटो मोठ्या प्रमाणात शेअर देखील करत आहेत.

दरम्यान, दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची दिग्दर्शक शकुन बत्राच्या ‘गहराइयां’ चित्रपटात अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसली होती. तर आता दीपिका पदुकोण दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय ती सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ या चित्रपटात हृतिक रोशनचे काम करताना दिसणार आहे.