मुंबई : बॉलीवूडमध्ये कित्येक वर्ष झाले कार्यरत असलेले प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. लैंगिक छळ, पाठलाग आणि मारहाणीच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश आचार्य यांच्यावर 2020 मध्ये त्यांच्या एका को-डान्सरने आरोप केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, गणेश आचार्यने तिला कथितरित्या सांगितलं होते की, जर तिला यशस्वी व्हायचं असेल तर (मे 2019 मध्ये) तिला त्यांच्यासोबत सेक्स करावं लागेल. यावर महिलेने नकार दिला. यानंतर सहा महिन्यांनंतर इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनने तिचं सदस्यत्व रद्द केलं. यामुळे या महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, या प्रकरणात गणेश आचार्य यांनी आणखी काही प्रतिक्रिया देण्यास दिलेली नाही. गणेशने आरोपांना वारंवार नाकारलं असून सर्व आरोप खोटे आणि निराधार म्हटलं आहे.
रिपोर्टनुसार, पोलीस संदीप शिंदे यांनी सांगितलं की, गणेश आचार्य आणि त्याच्या सहाय्यकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 354-A (लैंगिक छळ), 354-C (स्टारिंग), 354-डी (गणेश आचार्य लैंगिक छळ प्रकरण) , 509 (कोणत्याही महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करणे), 323 (दुखापत करणे), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान करणे), कलम 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 34 (गुन्हा करण्याचा सामान्य हेतू) या सर्व आरोपांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.