मुंबई : साऊथचा सुपरस्टार प्रभासबद्दल एक बातमी समोर येत आहे, जी ऐकून त्याचे चाहते खूप दुःखी झाले आहेत. एका रिपोर्टनुसार, प्रभास नुकताच स्पेनला रवाना झाला होता, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.

प्रभासला ही दुखापत आताची नाही तर काही काळापूर्वी झाली होती. तो त्याच्या आगामी ‘सालार’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. यादरम्यान त्याला दुखापत झाली आणि त्याने या दुखापतीकडे फारसे लक्ष दिले नाही आणि हळूहळू वेदना वाढू लागल्यावर प्रभासला शस्त्रक्रियेसाठी परदेशात जावे लागले. ही छोटीशी शस्त्रक्रिया असल्याचं बोललं जात आह. मात्र, ऑपरेशनमुळे प्रभासला डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. ही बातमी कळताच प्रभासचे चाहते त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान, प्रभासच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘प्रोजेक्ट के’टमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो बॉलिवूडच्या मेगास्टार अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे. यासोबतच तो ‘आदिपुरुष’मध्येही दिसणार आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत सैफ अली खान आणि क्रिती सेनन झळकणार आहेत.