मुंबई : बॉलीवूडमध्ये अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री नर्गिस फाखरी फार कमी चित्रपटात झळकली आहे. नर्गिसने मात्र, आता बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. तिच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्काच बसला आहे. ति असे का करतीये? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांकडून विचारले जात आहे. यावर आता नुकतंच नर्गिसने वक्तव्य करत तिने बॉलीवूड सोडण्यामागचे कारण सांगितले आहे.

बॉलीवूड सोडण्याच्या निर्णयावर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नर्गिसने सांगितले की, “कुठेतरी मला असे वाटत होते की माझ्यावर कामाचा दबाव वाढत आहे, ज्यामुळे मी खूप तणावात होते. मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही मिस करत होतो. मला आठवते 2016 आणि 2017 मध्ये मला याची जाणीव झाली. या कामातून मला आनंद मिळत नसल्याची जाणीव झाली. मी बॅक टू बॅक चित्रपटांमध्ये काम केले, त्यादरम्यान बरेच काही घडत होते. मला ते थांबवायचे होते. माझे मन आणि शरीर यांचा समतोल राखण्यासाठी मला ते थांबवावे लागेल हे मला जाणवले आणि म्हणूनच मी हे पाऊल उचलले.” असं नर्गिस म्हणाली.

पुढे मुलाखतीत ती म्हणाली, “कधीकधी एकटे राहणे कठीण असते, माणूस म्हणून तुम्हाला सपोर्ट सिस्टमची गरज असते म्हणून मी न्यूयॉर्कला परत गेले. मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबियांना खूप दिवसांपासून भेटले नव्हते, म्हणून जेव्हा मी परत गेले तेव्हा मी त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला. आता मी पूर्णपणे छान आहे’. असंही नर्गिस म्हणाली.