मुंबई : सध्या इंडस्ट्रीत फक्त अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चा होत आहेत. येत्या 17 एप्रिल एप्रिलला हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याच्या सतत बातम्या येत आहेत. यावर ना कपूर ना भट्ट कुटुंबाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या लग्नावर आता आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी प्रतिक्रिया देत. सतत येणाऱ्या बातम्या या खऱ्या असल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजेच या महिन्यात आलीया रणबीर लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रॉबिन भट्ट हे महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांचे सावत्र भाऊ आहेत. जे बॉलीवूडचे सुप्रसिद्ध लेखक देखील आहेत. मीडियाशी संवाद साधताना रॉबिन भट्ट यांनी पुष्टी केली की आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सात फेरे घेणार आहेत. बॉलीवूड जोडप्याचा विवाह सोहळा चार दिवसांचा असेल, ज्यांचे सेलिब्रेशन आरके हाऊसमध्ये होणार आहे. तसेच, रॉबिन भट्ट यांनाही भट्ट कुटुंबाकडून लग्नाचे निमंत्रण आले असल्याचे रॉबिन यांनी सांगितले.

दरम्यान, आलिया आणि रणबीर हे अगदी साध्या पद्धतीने लग्न करणार आहेत. ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे लोक लग्नाला उपस्थित राहणार आहेत आणि या लग्नात फक्त एक किंवा दोन फंक्शन असतील. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी 20 जानेवारी 1980 रोजी आरके हाऊसमध्ये सात फेऱ्या मारल्या आणि आई-वडिलांप्रमाणेच रणबीर कपूरही चेंबूरमधील कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये सात फेऱ्या मारणार आहे.