मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजवला होता. याच पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये वेगवेगळे निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, आता करोनाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात होणारी घट पाहता आज महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सर्वं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात मास्कचा वापर देखील बंधनकारक असणार नाही. ज्यांना मास्क वापर करायचा असेल त्यांनी मास्कचा वापर करावा. मास्कचा वापर हा ऐच्छिक आहे, असं राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. राज्यात अनेक लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली आहे. त्यामुळे निर्बंध कोरोना निर्बंध हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध हटवल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.