मुंबई: ‘बिग बॉस 15’पासून करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची जोडी खूप चर्चेत आहे. दोघांच्या जोडीला चाहते भरभरून प्रेम देत असतात. दरम्यान, दोघांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. दोघांचे लग्न झाल्याच्या चर्चा होत आहेत. याचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर करण आणि तेजस्वीचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये करण-तेजस्वीचे लग्न झालेले दिसत आहे. फोटोत तेजस्वीने ब्राईडल घागरा घातलेला दिसत आहे तर करणने शेरवानी घातलेली दिसत आहे. या फोटोत आणखी एक खास गोष्ट म्हणजे अभिनेत्री रश्मी देसाईही या फोटोत दिसत आहे. जी तेजस्वीची बिंदी उचलत आहे. तेजस्वी-करणचा हा फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे.

दरम्यान, हे फोटो पाहून या दोघांनी लपून तर लग्न नाहीना केले? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो की, या दोघांनी अद्यापही लग्न केलेले नाही आणि राहिले या फोटोचे तर हा फोटो खरा नसून एडिट केलेला आहे.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची भेट ‘बिग बॉस 15’च्या घरात झाली होती. तिथे दोघेही आधी एकमेकांचे मित्र बनले होते, त्यानंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि शो संपून झाला असला तरी हे कपल एकत्र आहेत. दोघे सतत एकमेकांसोबत वेळ घालवताना स्पॉट होतात. दोघांची ही जोडी त्यांच्या चाहत्यांना ही खुप आवडते.