मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हासन आणि शांतनु हझारिका गेली 2 वर्ष एकमेकांना डेट करीत आहेत. दरम्यान, या दोघांनी लग्न केले असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. यामुळे सर्वांना धक्काच बसला आहे. हे लग्न कधी झाले? आणि त्यांनी सर्वांना सांगितले का नाही? असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांकडून विचारले जात आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शांतनुने त्याच्या आणि श्रुतीच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. यावेळी त्याला विचारलं गेलं होतं की, “श्रुती सोबतचं हे नातं पुढे नेण्यासाठी तो लग्नाचा विचार करीत आहे का?” त्यावर त्यानं उत्तर देताना “आम्ही मनातून केव्हाच लग्न केलं आहे. मनानं आम्ही एकमेकांचा पती-पत्नी म्हणून स्विकार केला आहे आणि त्यामुळेच आमचं नातं अधिक घट्ट झालेलं पहायला मिळत आहे. आमच्यासाठी हे नातं अधिक स्पेशल त्यामुळेच बनू शकलं. हो पण रीतीपरंपरेनुसार जसं लग्न करतात ते कधी होईल मला माहित नाही. गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या तर बघू पुढे होईलच आमचं लग्न”. असं शंतनू म्हणाला.

शांतनुच्या या उत्तराने सगळीकडे खळबळ होत आहे.
दरम्यान, श्रुती हसन आणि शांतनु हझारिका एकमेकांना 2018 पासून ओळखत होते. पण कोरोनाच्या काळात दोघे एकमेकांच्या जवळ आले, मैत्री झाली आणि मग एकमेकांना डेट करण्यास त्यांनी सुरुवात केली. मुंबईत ते दोघे सध्या लीव्ह-इन मध्ये राहत आहेत. लवकरच ते लग्नही करतील असे म्हंटले जात आहे.