मुंबई : ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यामुळे मुंबईतील एका पत्रकाराने अग्निहोत्री यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ‘मी भोपाळमध्ये लहानाचा मोठा झालो आहे. पण मी भोपाळी नाही आहे. कारण भोपाळी खूप वेगळे असतात. मी तुम्हाला कधीतरी खाजगीत सांगेन. कोणत्याही भोपाळीला विचारा, भोपाळीचा अर्थ होमोसेक्शुअल आहे, नवाबी शौक असणारा.’ शब्दाचा अर्थ होमोसेक्शुल असं अग्निहोत्री यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत भोपाळी लोकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुंबईतील एक पत्रकार रोहित पांडे यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रोहित पांडे हे मुळचे भोपाळचे राहणारे आहेत. त्यांनी आपल्या तक्रारीत विवेक अग्निहोत्री यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
इस दोयम दर्जे की मान्यता के लिए मेरी ओर से..#I_M_Sorry_Bhopal
भोपाली होना होमोसेक्सुअल होना कैसे हो सकता है..?
लखनऊ,हैदराबाद,मैसूर भी तो नवाबी शहर हैं..तो क्या वहां भी..! छि:
अगर हम भी कहते फिरें कि तनु श्री दत्त आपको लेकर ऐसा बोलती है तो क्या आप मान लेंगे.!@vivekagnihotri pic.twitter.com/teh5fmixZ0
— Govind ਗੋਵਿੰਦ گووند गोविंद गुर्जर (@govindtimes) March 25, 2022
मुंबईतील वकील काशिफ खान देशमुख यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीत रोहित पांडे यांनी म्हटलंय, ‘प्रमोशनच्या नावाखाली वाद उभा करून विवेक अग्निहोत्रींना ‘द कश्मीर फाइल्स’मधून नफा कमवायचा आहे. या चित्रपटानं आतापर्यंत २०० कोटींची बक्कळ कमाई केली आहे मात्र विवेक अग्निहोत्री यांनी अद्याप यातील एक पैसा देखील विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी वापरलेला नाही.’
‘भोपाळचा रहिवासी असल्याच्या नात्यानं ही मुलाखत पाहून मला लाज वाटते. ते स्वतः भोपाळी असूनही त्यानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यप्रदेश आणि भोपाळची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्वतःच्या शब्दांवर अजिबात नियंत्रण नाही आणि त्यामुळे ते या समाजासाठी हानिकारक आहेत.’ अस या तक्रारीत म्हंटल आहे.