मुंबई : राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्या संदर्भात नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. जया बच्चन भोपाळच्या एका जमिन वादात अडकल्या आहेत. जया यांनी पैसे घेऊन जमिनीचा करार रद्द केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. एवढेच नाहीतर या प्रकरणी भोपाळ जिल्हा न्यायालयाने जया बच्चन यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीसही बजावले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जया बच्चन यांची भोपाळच्या सेवेनिया गौर गावात पाच एकर जमीन आहे. जया बच्चन यांचा माजी आमदार जितेंद्र डागा यांचा मुलगा अनुज डागा याच्यासोबत सुमारे एक कोटी रुपये प्रति एकर जमीन विकण्याचा करार झाला होता. अनुज डागा यांनीही जया बच्चन यांच्या खात्यात एक कोटी रुपये जमा केले होते. माञ, सहा दिवस बँक खात्यात पैसे ठेवल्यानंतर जयाने गुपचूप हे पैसे परत केले आहेत.

अनुजच्या वकिलाचे म्हणणे आहे की, राजेश यादवने जयाच्या वतीने आणखी पैशांची मागणी केली आहे. तो म्हणतो की आता जयाला तिची जमीन दोन कोटी रुपये प्रति एकरला विकायची आहे. मात्र, आधीचा करार मोडल्यामुळे या प्रकरणी अनुज जया बच्चन यांच्या विरोधात न्यायालयात गेला आहे. या प्रकरणी आता न्यायालयाने जया यांना ३० एप्रिल रोजी त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे.