मुंबई : आयपीएल 2022 च्या सामन्यांसाठी स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. तिकिटे आज दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. चाहते आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते बुक करू शकतात आणि तिकिटाची किंमत पाहून बुक माय शो वर देखील बुक करू शकतात.
इंडियन प्रीमियर लीग 26 मार्चपासून सुरू होत आहे, पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना खास असणार आहे. कारण, बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षक थेट आयपीएल सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येणार आहेत.
आयपीएल 2022 च्या ग्रुप स्टेजमध्ये एकूण 70 सामने खेळवले जातील. महाराष्ट्रातील 4 स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत. सर्व स्टेडियममध्ये 25 टक्के क्षमतेसह प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे.