मुंबई : बॉलिवूड सिंगर बेबी डॉल कनिका कपूर पुन्हा एकदा लग्न करणार आहे. कनिका २० मे २०२२ रोजी तिचा प्रियकर गौतमसोबत सात फेरे घेणार आहे. गौतम एक एनआरआय आहे. माहितीनुसार, हे लग्न लंडनमध्ये होणार आहे. कनिकाने गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची खरेदी सुरू केली आहे. कनिकाने तिच्या तीन मुलांसाठीही शॉपिंग केली आहे.

कनिका कपूरचे पहिले लग्न १९९७ मध्ये एनआरआय उद्योगपती राज चंडोकसोबत झाले होते. तेव्हा कनिका फक्त १८ वर्षांची होती आणि आता ती ४३ वर्षांची आहे. २०११ मध्ये दोघांमध्ये मतभेद सुरू झाले आणि २०१२ मध्ये दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले होते. दोघांना तीन मुले आहेत. पण ही मुलं अजूनही कनिकाकडेच राहतात. योगायोगाने कनिकाचा दुसरा नवरा देखील एनआरआय असून तो लंडनला असतो.

कनिका कपूर आणि गौतम यांनी सहा महिन्यांपूर्वीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने या लग्नाची तारीख निश्चित होत नव्हती, पण आता लवकरच हे लग्न होताना दिसत आहे. कनिका कपूर ही बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे, पण तिला सर्वाधिक प्रसिद्धी ‘बेबी डॉल’ या गाण्यातून मिळाली होती.