मुंबई : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आशा यांचा मुलगा आनंद भोसले यांना दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आनंद अचानक जमिनीवर पडला आणि त्याला दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा आशा भोसले याही दुबईत होत्या आणि त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आनंद अचानक जमिनीवर पडला आणि त्याला किरकोळ दुखापत झाली. मात्र, आता तो धोक्याबाहेर असून त्याला आयसीयूमधून खोलीत हलवण्यात आले आहे. आशा भोसले अजूनही त्यांच्या मुलासोबत आहेत. एका सूत्राने मीडियाला सांगितले की, हे सर्व अचानक घडले, त्यामुळे कुटुंबात तणावाच वातावरण निर्माण झाल आहे. मंगेशकर आणि भोसले यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंदच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आजही जवळपास दररोज दुबईला फोन करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदला घरी जाण्याची परवानगी कधी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आनंदच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर, त्याला एक मुलगी जनाई भोसले आहे. ही आशा भोसलेसारखीच गायनात अव्वल आहे.