मुंबई : ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ‘RRR’ चित्रपटाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधीच चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता होती. रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुव्वा उडवला आहे. मात्र, या सगळ्यात आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

‘RRR’ या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि अजय देवगणसोबत आलियाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे. आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘RRR’ या चित्रपटातही तिची महत्त्वाची भूमिका साकारली आहे. माहितीनुसार, आलियाने RRR चित्रपटाशी संबंधित पोस्ट डिलीट केल्या आहेत.

माहितीनुसार, बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली आलिया भट्ट चित्रपटातील तिच्या मर्यादित दृश्यांमुळे एसएस राजामौली यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. आलिया भट्टने ‘RRR’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात आलिया आपली भूमिका साकारण्यात अपयशी ठरली असल्याच म्हंटले जातं आहे. आलिया भट्टच्या आधी श्रद्धा कपूर आणि परिणीती चोप्रा यांनाही सीतेची भूमिका ऑफर करण्यात आली होती.