मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत आणि अभिनेता धनुष यांच्या झालेल्या घटस्फोटामुळे दोघे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत पाहायला मिळत आहे. घटस्फोट झाल्यापासून दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे जात आहे. दरम्यान, ऐश्वर्या रजनीकांतनं नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे दोघांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

धनुष आणि ऐश्वर्या वेगळे झाले असले तरी ते एकमेकांसोबतच त्यांचं मैत्रीचं नात जपत आहेत. काही दिवसांपूर्वीच धनुषनं ऐश्वर्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केली होती. त्याची ही पोस्ट बरीच चर्चेत होती. या पोस्टमध्ये धनुषनं ऐश्वर्याचा उल्लेख मैत्रीण असा केला होता. त्याच्या या पोस्टनंतर ऐश्वर्यानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये मोठा बदल केला आहे. तिनं आपल्या सोशल मीडियावर हॅन्डलवरून धनुषचं नाव काढून टाकलं आहे. तिच्या या निर्णयाने सर्वाना आश्चर्यचकित केले आहे.

ऐश्वर्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ऐश्वर्या धनुष असे नाव होते. मात्र, आता तिने तिच्या ट्विटर हॅन्डवरून धनुषचं नाव काढून टाकत आता ते ऐश्वर्या रजनीकांत असं केलं आहे. यात विशेष गोष्ट म्हणजे तिचे युजरनेम अद्याप ऐश्वर्या आर धनुष असंच आहे. आता हे दाक्षिणात्य लोकप्रिय कपल एकत्र येतील का नाही हे आपल्याला वेळेनुसार कळेल. मात्र, दोघांनी पुन्हा एकत्र यावे अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांकडून सतत व्यक्त केली जाते.