मुंबई : आजकाल इंडस्ट्रीतील कलाकार सतत फसवणुकीच्या जाळ्यात अडकत आहेत. नुकतीच अभिनेत्री रिमी सेनची अनेक कोटींची फसवणूक झाली. हे प्रकरण संपते का नाही की आता अभिनेता राजकुमार रावची फसवणूक झाली आहे. राजकुमार राव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

राजकुमार राव याने स्वतःच्या ट्विटरवर एक ट्विट केले आहे. त्यात त्यांने लिहिले आहे की, ‘फसवणुकीचा इशारा, माझ्या पॅन कार्डचा गैरवापर करून माझ्या नावावर 2500 रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे माझ्या CIBIL स्कोअरवर परिणाम झाला आहे. CIBILअधिकारी कृपया हे दुरुस्त करा आणि या प्रकरणात आवश्यक पावले उचला.’ असे राजकुमार राव याने या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रिमी सेन हिचीही फसवणूक झाली आहे. रीमाची एका व्यक्तीने तब्बल 4.14 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या संदर्भात रीमाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भादंवि कलम 420 आणि 409 अन्वये गुन्हा अंतर्गत आरोपींचा शोध सुरू केला आहे.