अहमदनगरचे माजी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि मुंबईतील पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.

त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव प्रस्ताव मुंबई पोलिसांनी गृह खात्याला पाठवला होता. त्यानंतर तो मुख्यमंत्र्यांकडे गेला होता.

मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली आहे. त्रिपाठी यांच्यावर मुंबईतील कुरिअर कंपनीकडून दहा लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

त्यावरून त्रिपाठी यांच्याविरोधात मुंबई क्राइम ब्रांचने काही दिवसांपूर्वीच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्रिपाठी १९ फेब्रुवारीपासून ड्यूटीवर आलेले नाहीत.

त्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. त्यामुळे त्यांना फरारी घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. तो आता मंजूर झाला आहे.