kl rahul
Big blow to Lucknow Supergiants; Fast bowler out of IPL

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2022 सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. यापूर्वीच नवीन फ्रेंचाइझी लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुखापतीमुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याला लखनौच्या संघाने मेगा लिलावात 7.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

सध्या इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजसोबत कसोटी सामना खेळत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी खेळाडूला दुखापत झाली त्यामुळे पहिल्या डावात त्याला फक्त 5 षटके टाकता आली. दुसऱ्या डावात तो मैदानातही उतरला नाही. तेव्हापासून ही दुखापत अधिक गंभीर असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील पुष्टी केली आहे की त्याची दुखापत गंभीर आहे आणि तो पुढील आठवड्यात इंग्लंडला परतेल.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी आणि आगामी आयपीएलमधून बाहेर पडल्याच्या वृत्ताला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दुजोरा दिला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत त्याला क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याच्या दुखापतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवणार आहे.