मुंबई : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच केकेआरला मोठा बसला आहे. केकेआरचे दोन खेळाडू सुरुवातीच्या पाच सामन्यांमधून बाहेर पडले आहेत. अशा स्थितीत केकेआरच्या संघासाठी हा दुहेरी धक्का म्हणता येईल.
ऑस्ट्रेलियन खेळाडू आरोन फिंच आणि पॅट कमिन्स हे आयपीएलच्या पहिल्या पाच सामन्यांमधून बाहेर पडले आहेत. फिंच आणि कमिन्स हे दोघेही ऑस्ट्रेलिया संघाच्या पाकिस्तान दौऱ्याचा भाग आहेत. मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर ते भारतात येणार आहेत.
या वृत्ताला दुजोरा देताना केकेआरचे मार्गदर्शक डेव्हिड हसी म्हणाले की, “ही चिंतेची बाब आहे, तुम्हाला तुमचे सर्वोत्तम खेळाडू उपलब्ध हवेत, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटही व्हायला हवे. प्रत्येक क्रिकेटपटूने त्यांच्या देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले पाहिजे जेणेकरून त्यांच्यात अशी वचनबद्धता असेल. मला वाटते की कमिन्स आणि फिंच पहिल्या पाच सामन्यात खेळू शकणार नाहीत पण ते पुढील सामन्यांसाठी तयार असतील.”
ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा 05 एप्रिल रोजी संपत आहे, तर KKR चा हंगामातील पाचवा सामना 10 एप्रिल रोजी आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन खेळाडू 5 एप्रिलनंतर आंतरराष्ट्रीय कर्तव्यातून मुक्त होतील. बायो बबलच्या नियमांमुळे त्यांना काही दिवस प्लेइंग इलेव्हनपासून दूर राहावे लागणार आहे.