मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगने काल एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी तिचा पती हर्ष लिंबाचिया आणि भारती यांनी सोशल मीडिया अकाउंटवर दिली आहे. त्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाळाला जन्म देऊन 24 तासही झाले नाहीत की भारती सिंग पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
भारतीने तिचे काही नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो भारतीने ती गरोदर असतानाच काढली होती. पण ही फोटो आता शेअर करत भारतीने याला एक खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले की, ‘जो पोटात होता तो आता बाहेर आला आहे, हा मुलगा आहे’, असं मजेदार शैलीत भारतीने या पोस्टला कॅप्शन दिले आहे. भारतीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, भारती आणि हर्ष 3 डिसेंबर 2017 रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर भारती सिंगने डिसेंबर 2021 च्या मध्यात सोशल मीडियार तिच्या गरोदरपणची बातमी शेअर केली होती. भारतीने एक मजेशीर व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली होती. त्यानंतर काल 3 एप्रिल 2022 रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.